व्हायरल सत्य! कोरोनामुळे केंद्राने महाराष्ट्रात जाहीर केली सुट्टी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांमध्ये १४ ते २१ मार्च या कालावधीत सुट्टी जाहीर केली आहे. असा दावा करणारे एक पत्रक सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलं आहे.

मुंबई : कोरोना विषाणूने अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला असून, भारतातही त्याचा प्रसार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या  विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून देशभरात काळजी घेतली जात आहे. यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर पुढाकार घेतला आहे. मात्र, असे असतानाच अफवांचा विषाणूने डोकं वर काढल्याचे पाहायवला मिळत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांमध्ये १४ ते २१ मार्च या कालावधीत सुट्टी जाहीर केली आहे. असा दावा करणारे एक पत्रक सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

ही बातमी वाचली का? पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

मात्र, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या नावाने सुट्ट्यांबाबत व्हायरल होत असलेलं  हे पत्रक फेक असल्याचं समोर आलं आहे. राज्य शासनाने केंद्राकडे विचारणा केली, त्यावर अशा स्वरूपाचे पत्र काढण्यात आले नाही, असे स्षष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे या पत्रावर विश्वास न ठेवता कोणीही अफवा पसरू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

ही बातमी वाचली का? प्रियांका चतुर्वेदींच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजीनाट्य!

काय म्हटलंय या पत्रकात?
या बनावट पत्रात महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश , सिक्किम या चार राज्यातील शाळा बंद करण्याचे आदेश स्थानिक सरकारला देण्यात आले आहे. याशिवाय शाळा बंद न ठेवल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असेही नमुद करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारकडून हे पत्रक खोटे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Corona, the central government has declared a holiday in Maharashtra.