आता रिया चक्रवर्तीच्या ड्रग केसचा फेरतपास करा : अ‍ॅड. मानेशिंदे

आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानं आता रिया चक्रवर्तीच्या केस कडेही संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे.
rhea chakraborty
rhea chakraborty

नवी दिल्ली : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (NCB) नुकतीच आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या ड्रग केसबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रियाचे वकील सतीन मानेशिंदे यांनी आता रिया चक्रवर्तीच्या ड्रग केसची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग केसमध्ये अटक झाली होती.

rhea chakraborty
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव; पुण्यात आढळले सात रुग्ण

अॅड. सतीश मानेशिंदे हे रिया चक्रवर्तीचे वकील आहेत त्याचबरोबर त्यांनी आर्यन खानची केसही लढली होती. कालच एनसीबीनं आर्यन खानविरोधात ड्रग्ज घेतल्याचे कुठलेही पुरावे नाहीत म्हणून त्याचं नाव आरोपपत्रातून वगळलं. यानंतर आता रिया चक्रवर्ती आणि शोविक प्रकरणाचीही फेरतपासणी व्हावी कारण या केसमध्येही कुठेही ड्रग्ज आढळले नव्हते किंवा त्यांची चाचणीही झाली नव्हती असा आरोप अॅड. मानेशिंदे यांनी केला.

rhea chakraborty
संभाजीराजेंचा निर्णय वैयक्तिक त्यामुळं छत्रपती घराण्याचा अपमान नाही - शाहूराजे

मानेशिंदे पुढे म्हणाले, "गेल्या तीन वर्षात एनसीबीनं अनेक लोकांवर कारवाई करत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यामुळं या कारवाया करण्याऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणांमध्ये केवळ व्हॉट्सअॅप चॅट मिळाले होते त्यांच्या चाचण्याही झाल्या नव्हत्या. आर्यन खान प्रकरणानं दाखवून दिलंय की या खोट्या केसेस आहेत. त्यामुळं रिया चक्रवर्तीच्या केसचीही फेरतपासणी व्हायला पाहिजे"

rhea chakraborty
विश्वप्रवक्त्यांना 'हा' अधिकार कोणी दिला?; चंद्रकांत पाटलांचा टोला

आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केलं होतं. यावर भाष्य करणं मात्र मानेशिंदे यांनी टाळलं आहे. मी यावर भाष्य करणं योग्य नाही मी केवळ एक वकील आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आर्यनचं नाव आरोपपत्रातून वगळलं यावर बोलताना मानेशिंदे म्हणाले की, शाहरुख खानच्या कुटुंबासाठी हा खूपच मोठा दिलासा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com