मुंबईतल्या मशिदींमध्ये यापुढे नमाजासाठी अशी असेल नियमावली...

मुंबईतल्या मशिदींमध्ये यापुढे नमाजासाठी अशी असेल नियमावली...

मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मंदिरं, मशिदी बंद आहेत. मात्र मुंबईत अजूनही धार्मिकस्थळे उघडण्याची परवानगी दिली नाही आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातल्या नागरिकांनी मशिदीत नमाजांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) आखली आहेत.

कोरोना व्हायरसनंतर मुंबईतील मशिदी पुन्हा एकदा सुरु झाल्यानंतर नमाज पडण्यासाठी बसण्याची पद्धत थोडीफार बदलेली असेल. दिल्लीतही सोमवारपासून मशिदी सुरु करण्यात आल्या. तिथेही मशिदींमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

मुस्लिमांना मशिदीतील सामान्य सुविधेचा वापर करण्याऐवजी घरी वूझू (wuzoo) (नमाज पठणाआधी अनिवार्य स्नान) करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवाय, त्यांनी मशिदीत केवळ पाच नमाज करणं अनिवार्य असेल. इतर ऐच्छिक नमाज घरी केले पाहिजेत, असंही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलं आहे. 

मशिदीत मास्क घालणे अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच 10 वर्षाखालील मुलांना आणि 65 वर्षावरील ज्येष्ठांना घरी नमाज पडण्यास सांगितलं आहे. लहान मुलांनी आणि ज्येष्ठांनी मशिदीला भेट न देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच ज्यांना कोणत्याही प्रकारचे आजार किंवा ताप आहे अशा लोकांनी मशिदीत येण्याचं टाळावे अशा सूचना देण्यात आले असल्याचं चार बंगल्या कब्रिस्तान मशिदीचे मौलाना अकरम इशती यांनी सांगितलं. 

मार्कझुल मारीफ, जोगेश्वरीचे मौलाना बुरहानुद्दीन कासमी म्हणाले, नमाजादरम्यान  सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे आणि उपासकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी नमाज करतानाचे स्वतःचे मॅट्स आणले पाहिजेत.  त्यांनी सामान्य मॅट्स, जपमाळ (rosary beads), टोप्या आणि मशिदीत ठेवलेल्या पवित्र कुराणच्या प्रती वापरण्यावर आळा घालणं आवश्यक आहे. मशिदीत आल्यावर शूज वेगळे ठेवणे आवश्यक असून त्यांचा एकत्रित गोळा करुन ठेवणं चुकीचं ठरेल. आवश्यक असल्यास, प्रत्येकाला सामावून घेण्यासाठी शुक्रवारी नमाजच्या दोन सत्रांचे आयोजन केले जाईल.

मोठी बातमी - मुंबईत शाळांचे ऑनलाईन वर्ग 15 जूनपासून?
 
25 मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मशिद लोकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तसंच लॉकडाऊनच्या काळात स्मशानभूमीही बंद ठेवण्यात आली आहे. केवळ पाच जणांना मृतदेह मुस्लिम कब्रिस्तानमध्ये आणण्याची परवानगी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com