राष्ट्रवादीची रणनीती ठरणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा सोमवारी (ता. ७) होणार आहे.

कर्जत (बातमीदार) : कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा सोमवारी (ता. ७) होणार आहे. हा मेळावा कर्जत दहिवली येथील यशदा मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडीच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात येणार आहे. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार सुनील तटकरे, विधान परिषद आमदार जयंत पाटील, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसुरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत उपस्थित राहणार आहेत. 

कर्जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेकापची साथ आणि नाराजांची मनधरणी करण्यात लाड यांना यश आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले हनुमंत पिंगळे यांचा खालापूर पट्ट्यात विशेष प्रभाव आहे. त्याचा फायदा लाड यांना होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now soon NCP Strategies