
Waghya Statue: महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तारखेनुसार राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी छत्रपती यांनी इथल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर आपल्या भाषणात मुद्दे मांडले. तसंच वादग्रस्त ठरलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबतही सडेतोड भूमिका मांडली. तसंच आता कुत्र्याचा हा पुतळा हटवण्याची वेळ असल्याचं सांगणारं एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.