Uddhav Thackeray slams Bala Darade: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या तोंडाला काळं फासण्याच्या धमकी देणाऱ्या नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांना उद्धव ठाकरे यांनी झापलं आहे. त्यामुळं नाशिकमध्ये याची चर्चा सुरु आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत ही घडामोड घडली. गेल्या आठवड्यात सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दराडे यांनी हे विधान केलं होतं.