विरार : आतापर्यंत वसई विरार मध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी कडून वीज पुरवठा होणार असल्याच्या बातम्या येत असतानाच आता वसई विरारकरांना टोरंट पॉवरकडून वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. टोरंट ही कंपनी सद्या भिवंडी मध्ये वीजवितरणाचे काम करत आहे. याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टोरंट पॉवर लिमिटेडला वीजेचे वितरण करण्यासाठी परवाना मंजूर करण्याचे निश्चित केले आहे.