
विरार: विरार जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी हेलिकॉप्टर राईड सुरू करण्यात येणार असून देवीच्यादर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. पुण्यातील वरद एव्हीएशन या कंपनीने वसई-विरार परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर राईड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई तालुक्यात पर्यटनासाठी वसई किल्ला,समुद्र किनारा, निसर्ग रम्य इतर ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत असतात त्यांना हवाई दर्शन हेलिकॅाप्टर राइडने घेण्याची पर्वणी अवघ्या एक ते दीड महिन्यात वसई-विरार मधील जनतेला मिळणार आहे
या राइडची प्रयोगिक चाचणी कालच प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे. चार आसनसंख्या असलेल्या हेलिकॅाप्टरमधून चार पर्यटक एका वेळी या राइडचा आनंद घेऊ शकणार आहेत. पर्यटकांना या राइडच्या माध्यमातून काही मिनिटांत विरारच्या जीवदानी मातेचे हवाई दर्शन घेता येणार असून पालघर जिल्हातील विविध पर्यटन स्थळांचे दर्शन या हवाई राईडमध्ये जनतेला मिळणार आहे.
सर्व सामान्य नागरिकांना परवडेल असा या राईडचा दर निश्चित करण्यात येणार असल्याचे जीवदानी मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात येत आहे. ही सफर यशस्वी झाल्यास या ठिकाणाहून शिर्डी,वणी,मुंबई आणि इतर ठिकाणची हवाई सफरही करता येणार आहे.
प्रायोगिक तत्वावर हेलिकॅप्टरची चाचणी घेणण्यात आली असून या मध्ये काही सुविधा अजून हव्या आहेत असे दिसून आले. आम्ही मंदिराची जागा हेलिपॅडसाठी देत असताना या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना परवडणाऱ्या दरात हवाई सफर करून देण्याचे संबंधित कंपनीला सांगितले आहे
- प्रदीप तेंडुलकर,जीवदानी देवी मंदिर विश्वस्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.