esakal | कोरोनाबाबतची हलगर्जी तरुणांना भोवतेय! 'या' तीन वयोगटातील रुग्णांची संख्या लाखावर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाबतची हलगर्जी तरुणांना भोवतेय! 'या' तीन वयोगटातील रुग्णांची संख्या लाखावर

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सव्वा सहा लाखांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यात 10 हजारांच्या वर कोरोना रुग्ण सापडत आहेत.

कोरोनाबाबतची हलगर्जी तरुणांना भोवतेय! 'या' तीन वयोगटातील रुग्णांची संख्या लाखावर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड


मुंबई  : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सव्वा सहा लाखांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यात 10 हजारांच्या वर कोरोना रुग्ण सापडत आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 477 कोरोनाग्रस्त आहे. मात्र, या आकडेवारीतून एक धक्कादायक बाब समोर आली असून तब्बल तीन वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या ही एक लाखाच्या वर आहे.

रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्डयांत "मासेमारी आंदोलन"; भिवंडी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रयत्न

21 ते 30 वयोगटातील 1 लाख 6 हजार 82 म्हणजेच 17.55 टक्के, 31 ते 40 वयोगटातील 1 लाख 27 हजार 110 म्हणजेच 21.03 टक्के आणि 41 ते 50 वयोगटातील 1 लाख 7 हजार म्हणजेच 17.76 % लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजेच 51 ते 60 वयोगटातील रुग्ण 95 हजार 768 इतके असुन एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण 16.07 टक्के आहे. 

कल्याणमधील नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरूवात; इतक्या दिवसांत पुर्ण होणार काम

पुरुषांचे प्रमाण वाढते- 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार, एकुण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण अधिक असुन ते वाढत आहेत. कोरोना संसर्गात पुरुषांचे प्रमाण 61 तर महिलांचे 39 टक्के आहे. तर, मृतांमध्ये ही पुरुषांचे प्रमाण अधिक असुन 65 टक्के एवढे प्रमाण आहे तर, 35 टक्के महिलांनी आपला जीव गमावला आहे.

60 हजारांवर कोरोना बाधित मुले - 
दरम्यान, लहान मुले ही कोरोना बाधित होण्याची संख्या वाढत असुन 0 ते 10 वयोगटातील बाधितांचे 4.03 टक्के आहे. आणि 10 ते 20 या वयोगटातील 7.15 टक्के प्रमाण आहे. 0 ते 10 वयोगटापर्यंत आतापर्यंत 23 हजार 995 बालके कोरोनाबाधित आहेत. तर, 11 ते 20 या वयोगटातील 42 हजार 529 मुले - मुली आहेत. त्यामुळे, या दोन्ही वयोगटातील लहान मुलांची बाधित होण्याची संख्या वाढत असल्याकारणाने डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तद्य डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top