राज्यात कोरोनाचा 'विस्फोट' ! रुग्णसंख्येने गाठला आजपर्यंतचा सर्वाधिक 'उच्चांक', तर इतक्या जणांचा...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

 सध्या राज्यात 4,99,387 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35,107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई : आज राज्यात दिवसभरात 3041 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 50,231 झाली आहे. आज 1196  रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण 14,600 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात 58 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 1635 वर पोचला आहे.

मोठी बातमी ः लॉकडाऊनचा असाही सदुपयोग; कासारवाडी ग्रामस्थांनी धरली स्वच्छतेची कास

राज्यातील  33,988 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात 58 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी मुंबईमध्ये 39, पुण्यात 6,  सोलापूरात 6, औरंगाबाद शहरात 4, लातूरमध्ये 1, मीरा भाईंदरमध्ये 1, ठाणे  शहरात 1 मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 34 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 58 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30  रुग्ण आहेत तर 27  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांमध्ये ( 67 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मोठी बातमी ः ...म्हणून म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पांना देण्यात आली परवानगी!

कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1635 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील 24 तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 23 एप्रिल ते 20 मे या कालावधीतील आहेत. 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3,62,862 नमुन्यांपैकी 3,12,631 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 50, 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2283 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16,913 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 66.60  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

मोठी बातमी ः ठाणे जिल्ह्यातील 'हे' योद्धे कोरोनाच्या विळख्यात; विशेष कक्षही केला तयार

आतापर्यंत 14, 600 रुग्ण बरे
आजपर्यंत राज्यातून 14,600 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4,99,387 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35,107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

number of corona patients in the maharashtra is over 50,000  3041 new patients added; Death of 58 victims


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients in the maharashtra is over 50,000 3041 new patients added; Death of 58 victims