कहर ! ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार पार, दिवसभरात इतक्या रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरी भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी (ता.19) नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील चार दिवसांच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचे दिसून आले.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरी भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी (ता.19) नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील चार दिवसांच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. मात्र इतर ठिकाणी रुग्णांची संख्या वाढतानाच समोर आली आहे. दिवसभरात 249 रुग्णांसह 4 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा 4 हजार 169 झाला असून मृतांची संख्या 128 झाली आहे. 

हे वाचा : 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

ठाणे पालिकाक्षेत्रात 84 नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 353 वर पोहोचला. तर सोमवारी रात्री उशिरा तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने मृतांचा आकडा 53 वर गेला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 57 बाधितांच्या नोंदीसह दोघांच्या जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 321 इतका झाला असून मृतांचा आकडा 39 वर गेला आहे. तर,  कल्याण डोंबिवलीत 38 रुगांच्या नोंदीसह एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 568 तर,  मृतांचा आकडा 12 झाला. उल्हानगरमध्ये 12 रुग्णांची नोंद करण्यात आली असून बांधीतांचा आकडा 138 झाला आहे. तसेच, मिरा भाईंदरमध्ये 25 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 376 झाला.

महत्वाची बातमी : Coronavirus : आता फक्त 'यांना'च मिळणार विनामूल्य उपचार, कल्याण-डोंबिवली पालिकेचा निर्णय

भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 44 झाला आहे. बदलापूरमध्ये 3 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 119 झाला. तसेच अंबरनाथमध्ये 10 नव्या रुग्णांमुळे बाधितांचा आकडा 46 वर गेला. तर,  ठाणे ग्रामीण भागात 19 नव्या बाधितांची तर एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 204 , तर  मृतांचा आकडा 4 झाला आहे. 

क्षेत्र  - नवे बाधित रुग्ण - मृत

  • ठाणे पालिका - 84 - 03 (सोमवारी रात्री उशिरा)
  • केडीएमसी - 38 - 01 
  • नवी मुंबई - 57 - 02
  • मीरा भाईंदर - 25 - 00
  • उल्हासनगर - 12 - 00 
  • भिवंडी - 01 - 00 
  • अंबरनाथ - 10 - 46 
  • बदलापूर - 03 - 00 
  • ठाणे ग्रामीण - 19 - 01

number of corona patients in Thane district has crossed 4,000, the number of patients continues to increase


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients in Thane district has crossed 4,000, the number of patients continues to increase