esakal | Coronavirus : आता फक्त 'यांना'च मिळणार विनामूल्य उपचार, कल्याण-डोंबिवली पालिकेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

kdmc

कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील कोव्हीड आजारावर उपचार घेणाऱ्या नागरिकांना यापुढे उपचारांचे पैसे द्यावे लागणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

Coronavirus : आता फक्त 'यांना'च मिळणार विनामूल्य उपचार, कल्याण-डोंबिवली पालिकेचा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील कोव्हीड आजारावर उपचार घेणाऱ्या नागरिकांना यापुढे उपचारांचे पैसे द्यावे लागणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. पालिकेने यासाठी दर निश्चित केले आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास पालिका संबंधितांवर कारवाई करेल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पिवळ्या तसेच केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारक नागरिकांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य उपचार केले जाणार आहेत.

हे वाचा : 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

पालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात तसेच कल्याणातील होली क्रॉस हॉस्पिटल येथे विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना पालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार क्वारंटाईन सेंटर तसेच कोव्हीडच्या उपचारांसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या नागरिकांना प्रतिदिन पाचशे रुपये द्यावे लागणार आहेत. पालिकेने डोंबिवलीतील आर आर हॉस्पिटल तसेच कल्याण शिळ मार्गावरील निऑन हॉस्पिटल समवेत सामंजस्य करार केले आहेत.

हे ही वाचा : अप्रतिम ! लॉकडाऊनमध्ये जोपासला अनोखा छंद, पक्षांच्या पिसांवर कोरलेली कलाकृती थक्क करणारी

पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना उपचारार्थ या दवाखान्यात दाखल करण्यात येणार आहे. तेथे जागा उपलब्ध नसल्यास कल्याणातील होली क्रॉस हॉस्पिटल येथे दाखल केले जाईल. याठिकाणी कोव्हीडच्या रुग्णांना प्रती दिनी जनरल वॉर्डसाठी 2800 रुपये, दोन पेशंट शेअरिंग साठी 3200 रुपये, स्पेशल रुमसाठी 3800 रुपये आकारले जाणार आहेत. आयसीयूसाठी 5000 रुपये तर व्हेंटिलेटरसाठी 2000 रुपये प्रती दिन असे दर असणार आहेत.

नक्की वाचा : गुड न्यूज आली,  कोरोना संक्रमित मातांकडून 203 सुखरूप बाळांचा जन्म

रुग्णालयात दाखल रुग्णांना आवश्यक असलेल्या डॉक्टर, नर्स तसेच त्यांचा जेवणाचा खर्च आणि पीपीई किटचा खर्च यातच समाविष्ट असेल, मात्र औषधे, तपासण्या तसेच इतर आवश्यक साहित्याचा खर्च वेगळा असेल. यासाठी रुग्णांना काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे.

Now only orange ration card holder get free treatment on covid, decision of Kalyan-Dombivali Municipal Corporation

loading image
go to top