चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 24 तासात अडीचशे पार, तर इतक्या जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून रविवारी (ता.17) ठाणे पालिकाक्षेत्रात बाधितांच्या आकडेवारीने शंभरी पार केली.

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून रविवारी (ता.17) ठाणे पालिकाक्षेत्रात बाधितांच्या आकडेवारीने शंभरी पार केली. रुग्णसंख्येसोबतच मृतांच्या आकडेवारीत देखील वाढ होत आहे. दरम्यान रविवारी जिल्ह्यात 255 नव्या बाधितांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 3 हजार 684 झाला असून मृतांचा आकडा 114 वर पोहोचला आहे.  

मोठी बातमी : ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रविवारी ठाणे पालिकाक्षेत्रात सर्वाधिक 88 बाधितांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 178 वर पोहोचला. तर,  दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने मृतांची संख्या 50 झाली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 62 बाधितांच्या नोंदीसह 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 190 इतका झाला असून मृतांचा आकडा 31 वर गेला आहे. तर,  कल्याण-डोंबिवलीत 41 नव्या रुग्णांसह एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा 500 तर, मृतांचा आकडा 11 झाला आहे. उल्हानगरमध्ये देखील 13 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील संख्या 119 झाली आहे. मिरा-भाईंदरमध्ये 18 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 330 झाला असून मृतांचा आकडा 10 झाला आहे. तर बदलापूरमध्ये 16 नव्या रुग्णांमुळे तेथील बाधितांचा आकडा 114 झाला.

हे ही वाचा : एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

दरम्यान भिवंडी पालिका क्षेत्रात आणि अंबरनाथमध्ये प्रत्येकी एका नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा अनुक्रमे 42 व 34 झाला आहे. यासोबतच, ठाणे ग्रामीण भागात 12 नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 177 वर गेला आहे.

number of corona positive in thane district has crossed 250 in 24 hours, while 9 people have died


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona positive in thane district has crossed 250 in 24 hours, while 9 people have died