esakal | एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 
sakal

बोलून बातमी शोधा

tablets

लॉकडाऊनमुळे सोलापुरात अडकलेल्या एका कर्करुग्णाला मध्य रेल्वेने २४ तासांच्या आत घरपोच औषधे पुरवली आहेत. विशेष म्हणजे रुग्णाच्या मुलाने केलेल्या विनंतीच्या एका ट्विटची दखल घेऊन मध्य रेल्वेने थेट घरी औषधे पोहोचवली. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली असून सोलापूरकर भारावून गेले आहेत. 

एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लॉकडाऊनमुळे सोलापुरात अडकलेल्या एका कर्करुग्णाला मध्य रेल्वेने २४ तासांच्या आत घरपोच औषधे पुरवली आहेत. विशेष म्हणजे रुग्णाच्या मुलाने केलेल्या विनंतीच्या एका ट्विटची दखल घेऊन मध्य रेल्वेने थेट घरी औषधे पोहोचवली. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली असून सोलापूरकर भारावून गेले आहेत. 

सुशील पाडी यांचे वडील लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे अडकले होते. ते नौदल कर्मचारी आहेत. रक्ताच्या कर्करोगाने ग्रासल्याने त्यांना औषधांची गरज होती. मध्य रेल्वेवरील प्रवासी वाहतूक बंद असली, तरी जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत 12 मे रोजी सुशील यांनी ट्विट करून मध्य रेल्वेकडे मदत मागितली. त्या ट्विटची दखल घेऊन मुंबई विभागातील वाणिज्य निरीक्षक (पार्सल) जितेंद्र मिश्रा यांनी लिपिक उत्तम दास यांच्या सहकाऱ्यानं 24 तासांच्या आत सोलापूरला पाडी यांची घरी औषधे पोहोचवली आहेत. विशेष पार्सल ट्रेनमधून ही औषधे पाठवण्यात आली. 

हेही वाचा: 'बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी?' घरपोच दारूचा पर्याय मिळाला मात्र मद्यप्रेमींची घालमेल सुरूच.. 

यानंतर सुशील यांनी पुन्हा ट्विट करून भारतीय रेल्वेचे आभार मानले. जलद प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वे आणि जितेंद्र मिश्रा आणि उत्तम दास (सीएसएमटी पार्सल कार्यालय) यांच्या विशेष सहकार्याबद्दल आभार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  

कोकणातही रेल्वेने औषधे:

सूरज पवार यांनी 6 मे रोजी ट्विट करून वैभववाडी येथे राहत असलेल्या काकूसाठी तात्काळ कर्करोगावरील औषधांची आवश्यकता असल्याचे कळवले होते. टाटा रुग्णालयातून मिळालेले औषध आजारी काकूपर्यंत कसे पोहोचवायचे, याची त्यांना चिंता होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून पार्सल गाड्यांची चौकशी करून रेल्वेकडे मदत मागितली होती. .

हेही वाचा: निलेश राणे - रोहित पवारांमध्ये ट्विटरवर जुंपली.. वाद चिघळणार

त्यानुसार, ओखा-एर्नाकुलम पार्सल ट्रेन वैभववाडी येथे थांबा नसतानाही फक्त औषधांचे पार्सल देण्यासाठी थांबवण्यात आली. त्यानंतर सूरज यांच्या काकूच्या घरी औषधे पोहोचवण्यात आली. त्याचप्रमाणे चिपळूण येथील प्रतीक यांच्या वडिलांसाठी हृयरोगावरील औषधे मालगाडीने पाठवण्यात आली. विशेष म्हणजे, त्यासाठी अनिर्धारित थांबा घेण्यात आला. त्यानंतर प्रतीक यांनी रेल्वेचे आभार मानले आहेत.

railway delivers medicins for cancer patient from mumbai to solapur read full story