पाहुणे म्हणून आले; डोईजड झाले!

नालासोपाऱ्यात नायजेरियन अमली पदार्थ तस्करीत सक्रिय
नालासोपाऱ्यात नायजेरियन अमली पदार्थ तस्करीत सक्रिय

वसई ः वसई-विरारमध्ये नागरीकरण वाढत असताना यात नायरेरियन नागरिकांची संख्याही कमालीची आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांचा उपद्रवही वाढत असून अमली पदार्थ तस्करीत त्यांचा मोठा सहभाग असल्याने अनेकदा समोर आले आहे.

पोलिसांकडे नायजेरियन नागरिकांची नोंदणी असून तीन हजारांहून अधिक नागरिक नालासोपारा आणि नायगाव परिसरात वास्तव्यास असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे पोलिसांबरोबरच नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

वसईत चाळी, इमारतींची संख्या मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगार या ठिकाणी लपून बसतात. आता नायजरियनदेखील नालासोपारा, नायगावमध्ये आसरा घेत आहेत. पश्‍चिम आफ्रिका येथील फेडेरल रिपब्लिक ऑफ नायजेरिया या देशातील नायजेरियन नागरिक वैद्यकीय उपचार, शिक्षण आणि पर्यटनासाठी भारतात येतात आणि विझा संपला, तरी अवैधरीत्या येथेच राहतात. मुंबई आणि मुंबई जवळच्या उपनगरात यांची संख्या कमालीची आहे

. अमली पदार्थ तस्करीत यांचे नाव आहेच. तसेच फ्रॉड ई मेल पाठवणे, पॉझी स्किम आणि साखळी मार्केटिंगद्वारे हे भारतीय नागरिकांना गंडा घालून लाखो रुपये उकळतात. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनतरही पोलिसांनी अशा अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत; परंतु पुन्हा दुसरे अमली पदार्थ तस्कर डोके वर काढत आहे.

वाद, मारामाऱ्यांचे प्रकार
नायजेरिन नागरिकांकडे दुचाकी, चारचाकीदेखील असतात. ड्रग्ज, कोकेनसारखे तरुणांना देशोधडीला लावणारे अमली पदार्थ त्यांच्याकडे अनेकदा सापडले आहेत. काही इमारतीत तर मोठमोठ्याने गाणी लावणे, त्यांच्यातच आपापसांत वाद, मारामाऱ्या असे प्रकारदेखील घडतात. एकतर त्यांची भाषा समजत नसल्याने त्यांच्याशी बोलावे तरी कसे, असा प्रश्‍न निर्माण होतो.

इमारतींमध्ये आसरा
वसई-विरार क्षेत्रात सुमारे तीन हजारांहून अधिक संख्या नायजेरियन नागरिकांची आहे. नायगाव आणि नालासोपारा पूर्व येथे हे नागरिक जास्त प्रमाणात दिसतात. पोलिसांकडे ४२ नायजेरियन नागरिकांची अधिकृत नोंद आहे. घरमालकास भाडेही जास्त देतात. त्यामुळे त्यांना घर घेणे कठीण जात नाही.

 संशयास्पद हालचाली दिसल्यास तपासणी केली जाते. गस्त घातली जाते. अमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर कारवाई केली आहे.
विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com