esakal | हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत अशी आहे कोरोनाची परिस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Dharavi Corona

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत अशी आहे कोरोनाची परिस्थिती

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असला तरी उपाययोजनांमुळे सध्या कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे. 100 चा आकडा गाठलेल्या धारावीत एका आठवड्यात रुग्ण संख्या 50 टक्यांनी घसरली असून सोमवारी दिवसभरात फक्त 37 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादत केवळ आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. इतरांना बेस्ट तसेच इतर सार्वजनिक वाहतुकींचा पर्याय ठेवला आहे. त्याचबरोबर उपाययोजना आणि दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे.

हेही वाचा: मुंबईत १८ वर्षापुढील लसीकरणात एक मोठं चॅलेंज

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत 8 एप्रिलला रुग्णसंख्या 99 वर पोहोचली होती. आतापर्यंत 25 मायक्रो कंटेनमेंट झोन आणि 556 इमारती सील करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, धारावीत कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून कोरोना सेंटर्सची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाढते लसीकरण आणि कोरोना चाचण्यांमुळे रुग्णांची संख्या 50 पेक्षा खाली आली आहे.

हेही वाचा: राज्याची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लसीकरण

अशी घटली रुग्णसंख्या

25 एप्रिल - 37

24 एप्रिल - 28

23 एप्रिल - 50

22 एप्रिल - 44

21 एप्रिल - 30

20 एप्रिल - 45

19 एप्रिल - 42

18 एप्रिल - 50

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

number of patients without symptoms in dharavi dropped by 50 percent during week

loading image
go to top