
BMC Election Voter List Update
ESakal
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत मतदार वाढल्याची ओरड अद्याप थांबलेली नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील १४ लाख ७१ हजार ५०७ मतदार वाढले आहेत. शहरी मतदार असलेल्या ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील मतदारसंख्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्याबरोबरच मतदारयादीतून चार लाखांहून अधिक जणांची नावे वगळल्याचेही स्पष्ट झाले आहे.