दिलासादायक ! पवईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, इतके जण तर कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पवई आतापर्यंत 179 जण कोरोनाग्रस्त असल्याचे अहवाल सांगत असला तरीही बाधितांमध्ये बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाधितांची संख्या अधिक असताना बरे होण्याचे प्रमाण 38 टक्क्यांवर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात येत आहे.

मुंबई : पवई आतापर्यंत 179 जण कोरोनाग्रस्त असल्याचे अहवाल सांगत असला तरीही बाधितांमध्ये बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाधितांची संख्या अधिक असताना बरे होण्याचे प्रमाण 38 टक्क्यांवर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात येत आहे. आतापर्यंत 67 जण कोरोना मुक्त झाले आहेत. असे असले तरीही लॉकडाऊनचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईतील वस्त्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. पवईत मार्च महिन्यात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर संख्या वाढत गेली. सध्या 179 बाधितांमध्ये 66 महिला तर 113 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मार्च महिन्यात 2, एप्रिल महिन्यात 31 तर मे आता पर्यंत 145 एवढी कोरोना बाधितांची संख्या सांगण्यात येत आहे. आताच्या संख्येनुसार पवईत 179 कोरोना बाधित रुग्ण आहेत.

महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांनो...! परिक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, वाचा

कोरोना पॉझिटिव्ह मिळून येण्याच्या संख्येत मे महिन्यात मोठी वाढ झाली असून, केवळ 21 दिवसात 145 लोकांना याची लागण झाली आहे. यातील पहिल्या आठवड्यात 37, दुसऱ्या आठवड्यात 66 तर तिसऱ्या आठवड्यात 42 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

number of patients recovering in Powai has increased, 62 are corona free


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of patients recovering in Powai has increased, 62 are corona free