परिचारिकेचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील परिचारिका सीमा संजय रासम (वय 57) यांचा बुधवारी सकाळी कुर्ला येथे अपघातात मृत्यू झाला. बायोमेट्रिक यंत्रावर हजेरी नोंदवण्यासाठी धावपळ करताना त्यांचा अपघात झाल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

राजावाडी रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली वेतनाशी जोडल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागते. सीमा यांना बुधवारी सकाळी कामावर जाताना कुर्ला येथे मागून आलेल्या एका वाहनाने धडक दिली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Nurse death in accident