
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सुरू असलेल्या पगाराच्या समस्या आणि कंत्राटी पद्धतीने परिचारिकांना कामावर ठेवण्याच्या सरकारने घेतलेल्या अलिकडच्या निर्णयाविरुद्ध राज्यव्यापी निषेधाची घोषणा केली आहे. राज्यभरातील परिचारिकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.