esakal | पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

congress

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

sakal_logo
By
संदीप पंडीत

विरार : न्यायालयाच्या (Court) निर्णयाने ओबीसींचे आरक्षण (obc reservation) रद्द झाल्याने पालघर जिल्हापरिषदेमधील (Palghar ZP) 15 उमेदवावरांचे पद गेले . त्या रिक्त झालेल्या जागांवर 5 ऑक्टोबरला मतदान (election) घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने (election commission of India) केल्याने साऱ्याच पक्षाची धावपळ होणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसने (congress) या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देऊन निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. या निवडणुकीत ओबिसिच्या जागेवर ओबीसी उमेदवारच देण्यात येणार आहेत ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार नसतील तिथे बाहेरचे उमेदवार न देता स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे किसान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पराग पष्टे (Parag pashte) यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे मोखाड्यात घरांची पडझड; सुदैवाने जीवितहानी टळली 

राज्यातील 6 जिल्हापरिषद आणि पंच्यायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणावरून रखडल्या होत्या त्यांचा मार्ग मोकळा झाला असून आता या निवडणुका 5 ऑक्टोबरला घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, त्याबाबतचा निवडणुकीचा कार्यक्रम हि आयोगाने जाहीर केला आहे. त्यात पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जगासाठी आणि पंच्यायत समितीच्या जागांसाठी हि निवडणूक होणार आहे.

सद्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये भाजप वगळून महाविकास आघाडीची सत्ता असली तरी या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी जाहीर केल्या प्रमाणे काँग्रेस या ठिकाणी स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याचे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी जाहीर केल्याने हि निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्याच बरोबर येत्या दोन दिवसात येथील उमेदवार हि निश्चित केले जाणार असून त्याची घोषणा हि करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्या बरोबर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिल्याने आता सत्तेतील इतर पक्ष काय करतात या कडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

या पोटनिवडणूका खालील जागांवर घेण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद-गट,

१) ५ उधवा,

२) ६ बोर्डी,

३) ११ कसा,

४) १५ सरावली,

५) १८ वणई,

६) २३ आलोंडे,

७) २८ आसे,

८) २९ पोशेरा,

९) ३१ गारगाव,

१०) ३२ मोज,

११) ३३ मांडा,

१२) ३४ पालसाई,

१३) ३५ आबिटघर,

१४) ४७ सावेरे-अंबुरे

१५) ४८ नंडोरे-देवखोप,

पंचायत समिती गण,

१) २९ ओसरविरा,

२) ३० सरावली,

३) ६४ सापने बुद्रुक,

४) ७५ नवापूर,

५) ७७ सालवड,

६) ८३ सरावली,( अवध नगर )

७) ८४ सरावली,

८) ८७ मान,

९) ८८शिगाव-खुताड,

१०) ८९ बऱ्हाणपूर,

११) ९१ कांढण,

१२) १०६ नवघर-घटीम,

१३) १०७ भाताणे,

१४) १०९ तिल्हेर,

loading image
go to top