उल्हासनगरात गांधी जयंतीच्या दिवशी गांजा वरून तरुणाची हत्या

On the occasion of Gandhi Jayanti in Ulhasnagar the youth was murdered
On the occasion of Gandhi Jayanti in Ulhasnagar the youth was murdered

उल्हासनगर - शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोलमैदान मधील प्रभाग समिती एकच्या कार्यालयासमोर एका तरुणाच्या डोक्यात पेवरब्लॉकची लादी टाकून निघृण हत्या करण्याची घटना भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली आहे. विशेष म्हणजे आज महात्मा गांधी जयंती असताना गांजा वरून गंजेडी त्रिकूटाने त्यांच्या मित्राची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने लवकरच हे त्रिकूट गजाआड होण्याची शक्यता आहे.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराची वेळ. गोलमैदानच्या बाहेर चार तरुण गांजा पिलेल्या अवस्थेत. त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची होते. चारपैकी तीन तरुण एका तरूणाला मारत मारत थेट प्रभाग समिती एकच्या कार्यलयासमोरील मैदानात आणतात. प्रथम बेदम मारहाण केल्यावर त्याच्या डोक्यात पेवरब्लॉकची लादी टाकून आणि तो ठार झाला याची खात्री करून पळ काढतात. प्रत्यक्षदर्शीने ही माहिती पोलिसांना सांगितली असून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजा लोंढे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिन्ही गंजेडी हे वाल्मिक नगरातील असून उल्हासनगर ठाण्याचे पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

विशेष म्हणजे जुलै महिन्यात देखील याच गोलमैदान परिसरातील प्रभाग समिती कार्यालयाच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकी खाली खून झाला होता. चार महिन्यानंतर पुन्हा याच भागात हत्येची घटना घडल्याने या ठिकाणी गर्दुल्ले, गंजेडी यांच्या वावरामुळे या परिसर असुरक्षित बनला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com