कर्तृत्ववान महिलांचा "सकाळ'तर्फे सन्मान 

कर्तृत्ववान महिलांचा "सकाळ'तर्फे सन्मान 

नवी मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे विविध क्षेत्रांतील दिग्गज व नामांकित महिलांना वूमेन्स इम्पॅक्‍ट ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. 10 मार्चला रविवारी संध्याकाळी नेरूळमधील तेरणा दंतमहाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा होणार आहे. स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील कलाकारांची या वेळी उपस्थिती राहणार आहे. इन्फ्राटेक व ए. टी. ऑईल हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. हावरे समूह हे सहप्रायोजक आहेत. 

समाजातील इतर वंचित घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी होतकरू महिलांच्या पाठीवर प्रोत्साहनपर कौतुकाची थाप देण्याचा सकाळचा हा प्रयत्न आहे. वूमेन्स इम्पॅक्‍ट ऍवॉर्डच्या माध्यमातून नेतृत्वाची चमक दाखवून स्वतःसोबतच समाजाचा विकास करणाऱ्या समाजातील महिलांचा सकाळतर्फे गौरव केला जाणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते कौतुक केले जाणार आहे. 

या कार्यक्रमात स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील "विठू माऊली' मालिकेतील विठ्ठलाची भूमिका करणारा अभिनेता अजिंक्‍य राऊत, पुंडलिकाचे पात्र साकारणारा अभिनेता अथर्व कर्वे, "मोलकरीण बाई' या आगामी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी व अभिनेत्री सारिका निलाटकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या महिलांना आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. तसेच इदानीम बॅंडच्या गायिका श्रुती जकाती यांच्या सुफी गाण्यांचा सदाबहार गाण्यांचा आनंद या वेळी घेता येणार आहे. या कार्यक्रमाला तेरणा रुग्णालय समूह, रौनक ऍडव्हर्टाइजमेंट, स्टार प्रवाह मराठी वाहिनी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com