अधिकाऱ्यांनी नाकारला बोनस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी मुंबई -नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिवाळीला मिळणारे सानुग्रह अनुदान (बोनस) नाकारले आहे. चांगले काम करण्यासाठी सरकारकडून आम्हाला वेतन व भत्ते दिले जातात, मग बोनस कशासाठी घ्यायचा, असे सांगून त्यांनी इतर अधिकाऱ्यांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. मुंढेंसह प्रतिनियुक्तीवर आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनीही बोनस घेतलेला नाही. त्यामुळे वाचलेले हे पैसे शहरातील इतर विकासकामांसाठी वापरण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

  महापालिकेने दर वर्षीप्रमाणे यंदाही कर्मचारी व अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) दिले. महापालिकेच्या कायम आस्थापनेवर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना 16 हजार, तर ठोक मानधनावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठ हजार 500 रुपये देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानंतर याचे वाटप करण्यात आले. महापालिकेकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा सर्व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. तर कर्मचाऱ्यांना महापालिकेने बोनसपोटी दिलेली रक्कम कमी पडल्याने काही कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बोनस नाकारला. एखाद्या आस्थापनेत चांगले काम केल्याच्या बदल्यात तुम्ही बोनस मागू शकता, अशी परखड भूमिका त्यांनी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात मांडली होती. अगदी त्याप्रमाणे त्यांनी बोनस घेतला नाही. मुंढेंसह त्यांच्यासोबत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बोनस घेतला नाही. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले पैसे विकासकामांवर खर्च केले जाणार आहेत. 

चांगले काम न करताच बोनस घेण्याची महापालिकेत परंपरा सुरू आहे. ती मोडून काढण्यासाठी मी स्वतःपासून सुरुवात केली. सर्वांनी तसा विचार केल्यास महापालिकेच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा वाटा राहू शकतो. 
- तुकाराम मुंढे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

यांनी नाकारला बोनस 
अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक सुहास शिंदे, उपसंचालक लेखा व कोषागारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मालमत्ता व एलबीटी कर विभाग उपायुक्त उमेश वाघ, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार, उपायुक्त अंबरिश पटनीगीरे. 

Web Title: Officer denied bonus