

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या सेवा रस्त्यावर शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी एका महिला प्रवाशावर ॲप-आधारित कॅब चालकाने अतिप्रसंग आणि विनयभंगाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरून चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने विमानतळावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.