
परिवहन विभागाने अॅप आधारित कॅब सेवांचे प्रति किमी २२.७२ रुपये भाडे निश्चित केले आहे.
मागणीच्या वेळेत भाडे १.५ पट वाढेल, तर मागणी नसलेल्या वेळेत २५% कमी होईल.
नवीन दरांमुळे प्रवाशांना प्रवास अधिक महाग पडणार असून खिशाला कात्री बसणार आहे.
Ola-Uber Fare Price Hike: अॅप आधारित कॅब सेवा वापरणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिवहन विभागाकडून अॅप आधारित कॅब सेवांचे भाडे १८ सप्टेंबरपासून निश्चित करण्यात आले असून प्रति किमी २२.७२ रुपये ठरवण्यात आले आहे. मागणीच्या कालावधीत हे भाडे १.५ पट वाढवण्याची परवानगी असेल तर मागणी नसलेल्या काळात २५ टक्के कमी भाडे आकारले जाईल. याबाबत मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी परिपत्रक काढले आहे.