ओला, उबरचा उद्यापासून बंद 

ओला, उबरचा उद्यापासून बंद 

मुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार असून दुप्पट-तिप्पट भाडे भरून प्रवास करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

ओला, उबर चालक सोमवारी परळमधून मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. या बेमुदत संपाबाबत चालकांच्या संघटनेतर्फे उद्या (ता. 16) भूमिका जाहीर केली जाण्याची शक्‍यता आहे. कंपनीने दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत, तसेच अपेक्षित भाडे मिळत नसल्याने दिवाळीपूर्वी ओला, उबरच्या चालकांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मध्यस्थी करून कंपन्यांना भाडे वाढवून देण्यास सांगितले; मात्र त्यानंतरही अपेक्षित भाडे मिळत नाही अशी तक्रार चालक करत आहेत. चालकांनी 22 ऑक्‍टोबरला सुरू केलेला बंद 12 दिवस चालला होता. चालकांनी किमान 100 ते 150 रुपये भाडे आणि किलोमीटरला 18 ते 23 रुपयांचा दर देण्याची मागणी केली आहे. कंपन्यांविरोधात चालक रविवारी फेरीही काढण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com