वसईत 80 वर्षांची वयोवृद्ध महिलेचा शॉक लागून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

वसईत 80 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेला इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. वसई पश्चिम नेवाळे परिसरात काल (ता. 30) दुपारी 4.45 वाजता ही घटना घडली आहे. 

नालासोपारा : वसईत 80 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेला इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. वसई पश्चिम नेवाळे परिसरात काल (ता. 30) दुपारी 4.45 वाजता ही घटना घडली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पण महावितरणाच्या भोंगळ कारभारणे एका महिलेचा जीव गेला आहे. त्यामुळे स्थानिक राहिवाशात तीव्र संताप व्यक्त होत आहे..

संतान सिलू सराई असे मयत महिलेचे नाव आहे. त्या आजारी असल्याने सकाळी 10 च्या सुमारास निर्मळ येथील डॉक्टर कडे गेल्या होत्या. डॉक्टर कडून दवाउपचार घेऊन दौडती आळी येथे माहेरी गेल्या, दुपारी 4.45 वाजता दौडती आळी येथून पुन्हा नेवाळे येथे घरी जाण्यासाठी निघाल्या असता डोनेल दौडती यांच्या जमिनीत चालू विजेचा तार तुटून खाली पडला होता.

आजूबाजूला पूर्ण पाणीच पाणी साचले होते, त्यावेळी जिवंत विजेच्या तारा चा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह पाण्यात पडला असल्याचे क्लासला जाणाऱ्या मुलांना कळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्याच्या नंतर ही घटना उघड झाली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old age lad died due to electricity shock in Vasai