जुन्या नोटांबाबतची सुनावणी स्थगित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - पाचशे-हजारच्या जुन्या नोटांबाबत रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांवर घातलेल्या निर्बंधांशी संबंधित याचिकांवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी तूर्त टळली आहे.

सोलापूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्हा बॅंकांनी केलेल्या याचिकांवर न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात याविषयीच्या मूळ याचिका प्रलंबित आहेत. याचिकांतील मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. याविषयीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात यावर तूर्त तरी सुनावणी होणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Web Title: old currency result stop