ओल्ड मर्क्‍सच्या कामगारांचा एल्गार

ओल्ड मर्क्‍सच्या कामगारांचा एल्गार

उरण : एपीएम टर्मिनल ओल्ड मर्क्‍समधून काढलेल्या ९९ कामगारांना कामावर घेण्यासाठी टर्मिनल प्रशासनच्या लोअर परेल येथील कार्यालयात निवेदन दिले आहे. त्यात कामावर न घेतल्यास २९ जुलैपासून कंपनी गेटसमोर साखळी उपोषण करीत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

या वेळी कामगारांसोबत माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, पागोटेचे सरपंच भार्गव पाटील, माजी गाव अध्यक्ष रजनीकांत पाटील एक दिवस उपोषणाला बसणार आहेत.

कामगारांच्या निवेदनाचा विचार एपीएम टर्मिनल ओल्ड मर्क्‍स कंपनी प्रशासनाने केला नाही, तर सर्व कामगार संपूर्ण कुटुंबासोबत दोन दिवस साखळी उपोषण करणार आहेत. या दोन दिवसांत त्यांची एकमेव मागणी पूर्ण न झाल्यास ३१ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असून कंपनीने दुर्लक्ष केल्यास गेटसमोर आत्मदहनाचा इशारा कामगारांनी दिला आहे. 

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, उरणचे आमदार मनोहर भोईर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, सभापती पंचायत समिती उरण, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, पोलिस महासंचालक, कोकण आयुक्त, कामगार आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, सहायक पोलिस आयुक्त शेवा, उरण तहसीलदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच चेअरमन जेएनपीटी व परिसरातील लोकप्रतिनीधी, कामगार संघटनांचे नेते या सर्वांना दिले आहे.

काय आहे प्रकरण?
५ फेब्रुवारी २०१८ ला एपीएम टर्मिनल ओल्ड मर्क्‍स द्रोणागिरी नोडमधील ९९ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आले.

९ फेब्रुवारीला त्या संदर्भात कंपनी प्रशासन, कामगार, लोकप्रतीनिधी यांची बैठक होऊन १२ मार्च २०१८ रोजी कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कामावर घेण्याचे लेखी 
आश्‍वासन दिले.

आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने डिसेंबरमध्ये कामगार आमरण उपोषणाला बसले. त्यावेळी १३ दिवस चाललेल्या उपोषणामध्ये बऱ्याच कामगारांना दवाखान्यात दाखल करावे लागले; तर दोन कामगारांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी कंपनी प्रशासनाने पुन्हा एकदा कामावर घेण्याचे आश्‍वासन दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com