

Old Monk Ban
ESakal
मुंबई : राज्यात 'ओल्ड मॉन्क' रमच्या विक्रीवरील बंदीच्या आदेशाला उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ३१) स्थगिती देण्यास नकार दिला; मात्र रमच्या बाटलीवरील (वेष्टन) '७ इयर्स ओल्ड ब्लेंडे' आणि 'व्हेरी ओल्ड व्हॅटेड' यासारख्या वर्णनांवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि असे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवल्यावर कंपनीने मजकूर बदलण्याची तयारी दाखवली.