ज्येष्ठांना हवा राखीव डबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - उपनगरी रेल्वेतून प्रवास करणे ज्येष्ठांसाठी अजूनही एक मोठे दिव्यच आहे. लोकलमध्ये ज्येष्ठांकरिता स्वतंत्र डबा ठेवण्याची मागणी जोर धरत आहे; मात्र प्रशासनाने जागेचा अभाव असल्याचे कारण पुढे करत ती मागणी दुर्लक्षित ठेवली आहे. त्यामुळे जर स्वतंत्र डबा देता येत नसेल, तर डब्याच्या प्रवेशद्वारासह पॅसेजचे दोन भाग करून कडेचा पूर्ण भाग (१३ किंवा २५ आसनांचा) ज्येष्ठांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आता केली जात आहे.

लोकलच्या काही डब्यांमध्ये ज्येष्ठांसाठी ठराविक आसने राखीव आहेत; मात्र डब्यातील तुडुंब गर्दीतून त्या टोकाच्या आसनांपर्यंत पोहोचणे ज्येष्ठांसाठी एक दिव्य ठरते. तसेच तेथे आधीच बसलेल्या प्रवाशांना उठवणे ज्येष्ठांना कठीण होते. त्यामुळे ही आसने रद्द करून ज्येष्ठांसाठी वेगळा डबा ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच जर अशा प्रकारे स्वतंत्र डबा ठेवता येत नसेल तर डब्याच्या प्रवेशद्वारासह पॅसेजचे दोन भाग करून कडेचा पूर्ण भाग ज्येष्ठांसाठी राखीव ठेवावा, असाही सूर प्रवासी आळवत आहेत. ज्येष्ठांसाठी डब्यामध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेला फार उलथापालथ वा खर्च करावा लागणार नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वे म्हणते, जागेचा अभाव
ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डबा ठेवण्याची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान रेल्वेने ही मागणी तत्त्वतः मान्य केली होती; मात्र असा वेगळा डबा कोठे व कसा करायचा, अशी व्यावहारिक अडचण रेल्वेने न्यायालयापुढे मांडली होती.

Web Title: old people reserve bougue