उल्हासनगरात ओमी कालानी यांनी अपंगांना दिला व्यवसाय, टी-स्टॉलची भेट

दिनेश गोगी
रविवार, 15 एप्रिल 2018

शहरात सक्रिय असलेल्या टीम ओमी कालानी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवून या अपंगांना व्यवसायाच्या रूपात टी-स्टॉल टाकून देण्याचा निर्णय घेतला.

उल्हासनगर - महानगरपालिका निवडणुकीत कमालीचा प्रभावशाली ठसा उमटवणारे पप्पू कालानी पुत्र ओमी कालानी यांनी उल्हासनगरातील 5 शिक्षित अपंगांना (विकलांग) व्यवसाय मिळून देताना त्यांना टी-स्टॉल ची भेट दिली आहे. अपंगांना भेट रुपी दिलेल्या या स्टॉलवर टीओके अर्थात टीम ओमी कालानी असे फलक झळकले आहेत. त्यामुळे अपंग आणि त्यांचा परिवार सुखावून गेला आहे.

5 अपंग शिक्षित असले तरी त्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे परिवाराची उपासमार होत असल्याची माहिती ओमी कालानी यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या शहरात सक्रिय असलेल्या टीम ओमी कालानी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवून या अपंगांना व्यवसायाच्या रूपात टी-स्टॉल टाकून देण्याचा निर्णय घेतला आणि महात्मा गांधी नगर बालकांजी बारी रोड, चोपड़ा कोर्ट, उल्हास स्टेशन, 1 नंबर बस स्टॉप, बिर्ला गेट या वर्दळीच्या ठिकाणी त्यांना टी-स्टॉल टाकून दिले. ओमी कालानी यांच्या हस्ते सर्व टी-स्टॉलचे उद्घाटन केले.

यावेळी मॅन्युफॅक्चर असोसिएशन अध्यक्ष पित्तु राजवानी, टीओके कार्याध्यक्ष संतोष पांडेय, प्रवक्ता कमलेश निकम, युवा नेता मोहन खंडारे, माजी नगर सेवक राजू खंडारे, शिवाजी रगडे, नाना बिराडे, सचिन भोईर, मागस्वर्गीय अध्यक्ष संदीप गायकवाड, शोभा जाधव फिरोज खान, युवा अध्यक्ष सुंदर मुदलियार, वाहतूक सेना अध्यक्ष मोनू सिद्दीकी, विद्यार्थी सेल अध्यक्ष सन्नी तेलकर, दिनेश राजपूत, मोहन सिंह, अब्बू जेवानी, दीपू निषाद, माजी नगरसेविका सुरेखा वेलकर, राजन वेलकर यांच्या सोबत अपंगांचे नातलग उपस्थित होते.

शिक्षित असल्यावरही अपंगांना रोजगार मिळत नाही.त्यांना लांबचा प्रवास करता येत नाही. ही निकड गृहीत धरून सुरवातीला 5 अपंगांना व्यवसायासाठी 5 टी-स्टॉल प्रमुख चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी टाकून दिले आहेत. पुढेही टीम ओमी कालानी यांच्या वतीने अपंगांसाठी सकारात्मक विचार केला जाणार, अशी प्रतिक्रिया ओमी कालानी यांनी व्यक्त केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Omi Kalani gave business to disabled people in Ulhasnagar