
Omi Kalani Team Support to Shinde shivsena
ESakal
उल्हासनगर : शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला.