esakal | 'व्यक्तीश: मत आज जाहीर करण्यापेक्षा'...अजित पवार म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar

'व्यक्तीश: मत आज जाहीर करण्यापेक्षा'...अजित पवार म्हणाले...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणासंदर्भात चर्चा होईल. जो काय निर्णय होईल, तो मुख्यमंत्री महाराष्ट्राला सांगतील. मोफत लसीकरणाचा विषय उद्या कॅबिनेटमध्ये येईल. माझी सही झाली आहे. मुख्यमंत्र्यांची सही झाली की, रीतसर मंत्रिमंडळात चर्चेला विषय येईल. महाविकास आघाडीतील सर्व सहकारी आपआपली भूमिका मांडतील, आणि त्यानंतर मुख्यमंत्री राज्यातील जनतेच्या हिताचा निर्णय जाहीर करतील" असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

एका पत्रकाराने अजित पवारांना मोफत लसीकरणाबद्दल त्यांचं मत विचारलं. त्यावर त्यांनी "व्यक्तीश: मत आज जाहीर करण्यापेक्षा २४ तास थांबा. मी आज मत व्यक्त केलं आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेतून उद्या वेगळा प्रस्ताव आला, तर मतभिन्नता म्हणून तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवाल. त्यापेक्षा थोडं थांबा" असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण नाही?

"लसीची कमतरता राज्याला नाही, तर देशाला आहे. लसी, ऑक्सिजन प्रकल्प, रेमडेसिव्हीर इंजेक्शन यावर आज भारत सरकारचं नियंत्रण आहे. त्यांच्या सांगण्यानुसार कोटा दिला जातोय. सध्या महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन आणि लसीचा साठा द्या, अशी आमची मागणी आहे. लसी आणि रेमडेसिव्हीर संदर्भात आपल्याकडे उत्पादन करणारे आठ ते दहा कंपन्या आहेत. त्यांचं रेमरडेसिव्हीर पुरेस पडत नाहीय. त्यामुळ् ग्लोबल टेंडर काढण्याच सूतोवाच केलं" अजित पवार यांनी सांगितलं.

loading image