esakal | नॅशनल पार्क मधील 'मास्टर झोनल प्लॅन' कागदावर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नॅशनल पार्क मधील 'मास्टर झोनल प्लॅन' कागदावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) परिघातील निवासी परिसरांमध्ये बिबट्यांचे (Leopard) वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे राहिवाश्यांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत.उद्यान परिसर पर्यावरण संरक्षण क्षेत्र असल्याने आसपासच्या निवासी स्थानिक परिसरात लपलेल्या वन्य प्राण्यांबाबत उपाययोजना करा अशी मागणी करण्यात येत आहे.

मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलच्या मागे असिस भवनात बिबट्या दुसऱ्यांदा दिसला.रहिवाश्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती उद्यान प्रशासनाला दिली. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासून याबाबतची खात्री करण्यात आली. राज्य सरकारकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे.५ डिसेंबर २०१६ ला याबाबतची अधिसूचना ही काढण्यात आली. या अधिसूचनेनुसार उद्यानाच्या आसपासचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे. मात्र अधिसूचना काढल्यानंतर पाच वर्षानंतर ही यासाठी असणाऱ्या आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली नाही.

उद्यानात वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. फुलांच्या अंदाजे १३०० प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या ४५ प्रजाती, सापांच्या ४३ प्रजाती, ज्यात विषारी सापांच्या ३८ प्रजाती, उभयचरांच्या १२ प्रजाती, पक्ष्यांच्या ३०० प्रजाती,तर फुलपाखरांच्या १५० प्रजाती आहेत.वन्यजीवांच्या दृष्टीने उद्यानाचे फार महत्व आहे. हे महत्व ओळखून ५ डिसेंबर २०१६ रोजी अधिसूचना काढून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवतीच्या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले. या परिसरात उद्योग,त्यांचे संचालन आणि प्रक्रिया प्रतिबंधित करण्यात आल्या. मात्र अधिसूचना काढून पाच वर्षांनंतर ही राज्य सरकारने झोनल मास्टर प्लॅन तयार केलेला नाही.

हेही वाचा: 'कोकणवासीयांना ठाकरे सरकारने वाऱ्यावर सोडलंय'

सरकारने दोन वर्षांच्या कालावधीत स्थानिक लोकांशी सल्लामसलत करून नियोजन करणे आवश्यक होते. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने आम्ही पर्यावरण मंत्र्यांना विनंती केली आहे. सरकारने मास्टर प्लॅनला त्वरित मंजुरी द्यावी,व वन्य प्राण्यांबाबत उपाययोजना कराव्यात.

-ऍड. गॉडफ्राय पिमेंटा, प्रमुख , वॉचडॉग फाउंडेशन

loading image
go to top