लोकलमधील तरुणीचा मोबाईल हिसकावणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कळवा : मुंब्रा स्थानकावर थांबलेल्या लोकलमधील तरुणीचा मोबाईल हिसकावणाऱ्या तरुणाला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली.

शुक्रवारी (ता. 24) रात्री पावणे नऊच्या सुमारास अंबरनाथ येथील सुस्मिता अनिल ओनकर ही तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत लोकलने ठाण्याहून कल्याणला जात होती. दरम्यान, लोकल मुंब्रा स्थानकावर थांबली असता एका अनोळखी तरुणाने महिला डब्यात शिरून सुस्मिताकडील 70 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. 

तरुणीने प्रतिकार केल्याने तरुण तिला धक्का देऊन पळून गेला. या झटापटीत तरुणी रेल्वेतून पडून जखमी झाल्याने रेल्वे पोलिसांनी तिला मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल केले. तिने सांगितलेल्या वर्णनावरून आणि सीसी टीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी शनिवारी सोहल रफिक अन्सारी (19) याला अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे पुढील तपास करीत आहेत. 
 
Web Title: One Arrested for Alleges of Mobile theft