वृद्धाची फसवणूक करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मुंबई - वांद्रे पश्‍चिमेकडील पाली हिल येथील एका मोकळ्या भूखंडाच्या व्यवहारात वृद्धाची 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ब्रोकरला अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अन्वर सुलेमान सोंडकर असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुंबई - वांद्रे पश्‍चिमेकडील पाली हिल येथील एका मोकळ्या भूखंडाच्या व्यवहारात वृद्धाची 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ब्रोकरला अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अन्वर सुलेमान सोंडकर असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अन्वर हा मालाडच्या मालवणी परिसरात राहतो. तो जागा खरेदी-विक्रीचे काम करतो. सात वर्षांपूर्वी त्याची ओळख तक्रारदारासोबत झाली होती. तक्रारदार एका विकसकाकरिता जमीन विक्रीचा व्यवहार करायचा. पाली हिल येथील मोकळ्या भूखंडावर बांधकाम केल्यास जास्त नफा मिळेल, अशा भूलथापा मारण्यात आल्या होत्या. त्यावर विश्‍वास ठेऊन तक्रारदाराने एका विकसकाकरता भूखंड खरेदी करण्याचे ठरवले. व्यवहार होताच तक्रारदाराने 25 लाख रुपये दिले होते. लवकरात लवकर भूखंडाची कागदपत्रे देऊ, असे अन्वरने तक्रारदाराला सांगितले होते. व्यवहारानंतर अन्वरने तक्रारदाराच्या नावावर भूखंड केला नव्हता. चौकशीदरम्यान तो भूखंड दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे तक्रारदाराला समजले. तक्रारदाराने अन्वरकडे पैशांची मागणी केली. अन्वर हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. फसवणुकीबाबत तक्रारदाराने अंबोली पोलिस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. अन्वर हा मालवणी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कळमकर यांच्या पथकाने अन्वरला मालवणी परिसरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. 

Web Title: one arrested for fraud case