घाटकोपर बॉंबस्फोटप्रकरणी एकाला औरंगाबादेतून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - मुंबई येथील घाटकोपर परिसरात वर्ष 2002 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटातील फरार संशयित आरोपीला बुधवारी दुपारी शहरातील शहानूरमियॉं दर्गा परिसरातून अटक करण्यात आली. याह्या अब्दुल रहमान शेख (वय 43 रा. रोशनगेट) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी एक दिवसाची हस्तांतरित पोलिस कोठडी सुनावली.

घाटकोपर परिसरात दोन डिसेंबर, 2002 मध्ये झालेल्या स्फोटात दोघे ठार, तर 49 जण जखमी झाले होते. बॉंबस्फोटानंतर याह्या अब्दुल रहमान शेख हा 21 वा आरोपी फरार होता. तो पाच ऑगस्टला आजारी पत्नीला भेटण्यासाठी शहरात येणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. यावरून गुजरात एटीएसचे एक पथक मंगळवारी सकाळीच औरंगाबादेत दाखल झाले होते. त्यांनी औरंगाबाद एटीएसच्या मदतीने त्याला अटक केली.

याह्या सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर
याह्या वर्ष 2002 पूर्वीपासूनच सौदी अरेबियात सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. काही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आल्यानंतर त्याने घाटकोपरमध्ये बॉंबस्फोट घडवून आणला होता. बॉंबस्फोटप्रकरणी एटीएसने तब्बल 20 जणांना अटक केली होती. सोळा वर्षांपासून याह्या अब्दुल फरार होता.

Web Title: one arrested in ghatkopar bomb blast case crime