हवाला रॅकेटप्रकरणी आणखी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - सहार पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हवाला रॅकेटप्रकरणी आणखी एकाला सोमवारी (ता. 16) अटक करण्यात आली. मोहम्मद सिद्दिकी शेख असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने शुक्रवार (ता. 20) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हवाला रॅकेटमध्ये मोहम्मदच्या अटकेमुळे आरोपींची संख्या 12 झाली आहे.

हवाला रॅकेटचा पर्दाफाश करताना सहार पोलिसांनी 5 एप्रिलला समीना सय्यद या महिलेला अटक केली होती. तिच्या पारपत्रावर विमानतळ अधिकाऱ्यांना संशय आला. तिच्या चौकशीत यापूर्वी अटक केलेल्या मोहम्मद माजिद बेलीफचे नाव समोर आले. माजिदची सहार पोलिसांनी कसून चौकशी केली, त्या वेळी तो नऊ जणांना घेऊन दुबईला जाणार होता, असे स्पष्ट झाले. मुंबईतल्या काही भागांतील तरुणांना 13 हजार रुपयांचे प्रलोभन आणि दुबईवारीच्या नावाखाली त्यांना हवाला रॅकेटमध्ये ओढले जात होते. त्यांना खर्चाकरिता काही रक्कम दिली गेली होती. तसेच त्यांच्या बॅंक खात्यात एक लाख दिराम जमा करण्यात आले होते. हवाला रॅकेटमध्ये काही जण सहभागी असून, ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दुबईला गेल्याची माहिती सहार पोलिसांना मिळाली. त्यांचा सहार पोलिस आणि विमानतळ अधिकारी शोध घेत होते.

Web Title: one arrested in hawala racket case