बोंबला ! मुंबईच्या जी टी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, वाचा नक्की काय झालंय.. 

बोंबला ! मुंबईच्या जी टी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, वाचा नक्की काय झालंय.. 

मुंबई - मुंबईच्या जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन रुग्णाचा शोध सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे आझाद मैदान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त संतोष वाळके यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबईतला धक्कादायक प्रकार - 

जीटी रुग्णालयातून कोरोना पोझिटिव्ह रुग्ण पळाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांची टीम या रुग्णाच्या शोधासाठी कामाला लागली असून शोध सुरू आहे. या रुग्णावर साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आणि आणखी विविध कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(बातमी अपडेट होत आहे )

one covid patient patient ran from mumbais GT hospital read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com