कचराकुंडीत सापडले एक दिवसाचे अर्भक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - अंधेरी येथे कचराकुंडीत गुरुवारी एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळले. त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले आहे. अंधेरी पश्‍चिमेच्या गावदेवी डोंगर परिरातील नूर मशिदीजवळील कचराकुंडीत आज सकाळी पावणेआठला एका नागरिकाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने याची माहिती डी. एन. नगर पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी अर्भकाला कूपर रुग्णालयात दाखल केले. अंधेरी- जुहू परिसरातील खासगी किंवा सरकारी नर्सिंग होममध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या महिलांची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: one day infant was found rubbish Latch