एपीएमसीत माल विकून परतणाऱ्याचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

ण्याहून एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल विकण्यासाठी आलेल्या संतोष पोळ या व्यक्तीचा जिपमधून पुणे येथे परतताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) पहाटे कळंबोलीत घडली.

नवी मुंबई - पुण्याहून एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल विकण्यासाठी आलेल्या संतोष पोळ या व्यक्तीचा जिपमधून पुणे येथे परतताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) पहाटे कळंबोलीत घडली. जिपचालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्याने कळंबोली पोलिसांनी चालक अनिल राणेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष पोळ हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात राहणारा आहे. संतोषसह भरत केदारे आणि पांडुरंग खांडभोर हे तिघे एपीएमपीसीत माल विकून सोमवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडीने गावी जाण्यासाठी निघाले. या वेळी पांडुरंग खांडभोर आणि संतोष पोळ हे दोघे पिकअपमध्ये पाठीमागे बसले होते. पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोडने जात असताना संतोष पोळ थुंकण्यासाठी पिकअपमधील फाळक्‍याजवळ गेला असताना चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे संतोष पाठीमागे पडला. त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला एमजीएम रुग्णालयामध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: One death due to accidental incident near kalamboli

टॅग्स