esakal | उल्हासनगरात रस्ता ओलांडताना टॅंकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बहिणीला भेटून परतताना झाल अपघात

उल्हासनगरात रस्ता ओलांडताना टॅंकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : भरधाव टॅंकरच्या धडकेत एका 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या अशोक-अनिल सिनेमागृहाजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 
सुनील पवार असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असून ते उल्हासनगर येथील भीम कॉलनी परिसरात कुटुंबासह राहत होते.

शुक्रवारी (ता. 23) दुपारी 1 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. बहिणीची भेट झाल्यानंतर ते घराकडे निघाले असताना उल्हासनगर-3 येथील अशोक-अनिल सिनेमागृहासमोरील रस्त्यावर भरघाव आलेल्या टॅंकरने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात पवार यांच्या डोक्‍याला, छातीला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आरोपी टॅंकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मयत सुनील पवार यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. 

loading image
go to top