शिवसेनेतील 'हा' गट म्हणतो भाजपकडे परत चला..

मृणालिनी नानिवडेकर
Wednesday, 20 November 2019

मुंबई :  हिंदुत्ववादी मतपेटी हेच आपले बलस्थान असल्याचे लक्षात आणून देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षासमवेत जी युती केली ती कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी मांडले आहे. सेनेला पंतप्रधानपद देण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांच्या लक्षात आणून दयावा अशी या ज्येष्ठांची इच्छा आहे असे समजते.

मुंबई :  हिंदुत्ववादी मतपेटी हेच आपले बलस्थान असल्याचे लक्षात आणून देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षासमवेत जी युती केली ती कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी मांडले आहे. सेनेला पंतप्रधानपद देण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांच्या लक्षात आणून दयावा अशी या ज्येष्ठांची इच्छा आहे असे समजते. शिवसेनेचे नागरी भागातून निवडून आलेले बहुतांश आमदार भाजपसमवेत जाण्याच्या विचाराचे आहेत, त्यामुळे आपल्या मागण्या पुन्हा एकदा त्याच मंचावर मांडाव्यात अशी विनंती पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांना करण्यात येणार आहे.

आज या संदर्भात त्यांच्या निकटवर्तीयांकडे प्रास्तविक करण्यात आले आहे असे विश्‍वसनीयरित्या समजते. कॉंग्रेसचे नेते आपल्याला कोणतेही आश्‍वासन देत नसून सतत राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करू एवढेच सांगत आहेत. ही आघाडी प्रत्यक्षात आली तरी ती आपल्या मतदारांना पटणारी नाही. सेनेला दिलेला शब्द पाळा अशी विनंती करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यात गैर ते काय असाही या नेत्यांचा पवित्रा आहे.

लोकसभा निवडणुकीत समवेत लढल्याने शिवसेनेला फायदा झाला , विधानसभेतही तसाच लाभ झाला याकडे लक्ष वेधले जाते आहे.सेनेला चर्चेत गुंतवून प्रत्यक्षात मध्यावधी निवडणुकांची तयारी धर्मनिरपेक्ष आघाडी करते आहेकाय अशी शंकाही या नेत्यांना येते आहे. निवडणुकांना सामोरे जावे लागल्यास शिवसेनेची अडचण होईल असे गृहितक या आघाडीत मांडले जाते आहे.

जनादेश स्पष्ट असूनही सरकार स्थापले जात नसल्याने जनतेत असंतोष आहे. या भावनेचा पुढल्या निवडणुकीत पुन्हा एकदा फटका बसू शकेल अशी भीतीही व्यक्‍त केली जाते आहे. मुंबई महापालिकेसह अन्य ठिकाणी सेनेला योग्य ती मानाची वागणूक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांच्या सारखे बरोबरीचे स्थान राष्ट्रवादी कॉंग्रेस देईल काय याबददल प्रश्‍न केला जातो आहे.

सेनेत अत्यंत वरिष्ठ पातळीवर वावरणाऱ्या या नेत्यांनी विधीमंडळ पक्षाचेनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि सेनेचे कार्यप्रमुख उदधव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. गेले काही दिवस दबक्‍या आवाजात सुरू असलेली ही चर्चा आता उदधवजींपर्यत पोहोचवावी, एनडीएतून आपल्याला काढून टाकले असले तरी या विषयावर एकदा थेट मोदींशी चर्चा करावी असा या मंडळींचा प्रस्ताव असल्याचे समजते. 

Webtitle : one group from shivsena wish to go back to BJP and NDA


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one group from shivsena wish to go back to BJP and NDA