esakal | हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप होणार? 
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप होणार? 

भाजपमधील खदखदीचा उद्रेक होणार? 

हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप होणार? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात महिनाभराच्या राजकीय नाटयानंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचं सरकार आलं.  त्यानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या भाजप मधील मोठया नेत्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. 

महत्त्वाची बातमी :  फालतू मेसेजेसला असा बसणार आळा; गुगल आणणार सर्वात मोठी अपडेट

गेल्या सरकारच्या काळात राज्यामध्ये ओबीसींच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र फडणवीस सरकार त्यांना न्याय देवू शकले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी लक्ष्य करून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. एवढंच नाही, त्यांना पराभूत करण्यात आले. त्यामुळेच सध्या अनेक भाजपाच्या नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर पडल्याचे दिसत आहे असा दावाही राऊत यांनी केला. भाजपातील बहुजन समाजाच्या मोठ्या नेत्यांमधील खदखद बाहेर पडतेय.

महत्त्वाची बातमी :  मुंबई पोलिसांना सतावतोय 'याचा' धोका, पोलिेसांबाबतची धक्कादायक बाब उघड

नागपूर अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर येत्या सोमवारपासून नागपूरात सुरू होणा-या अधिवेशनात भाजपात मोठा भूकंप होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असेही राऊत म्हणाले. काल परळीत झालेल्या मेळाव्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपातील कोण कोणते मोठे नेते पक्ष सोडणार हे लवकरच कळेल असं विधानही त्यांनी केले. तर भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात असून, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला आहे.  

WebTitle : one more biggest political earthquake will come in maharashtra in winter session