esakal | मुंबई मागोमाग आता नवी मुंबईतही कोरोनाचा बळी, म्हणून वारंवार सांगितलं जातंय घरीच राहा !
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई मागोमाग आता नवी मुंबईतही कोरोनाचा बळी, म्हणून वारंवार सांगितलं जातंय घरीच राहा !

महाराष्ट्रात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू 

मुंबई मागोमाग आता नवी मुंबईतही कोरोनाचा बळी, म्हणून वारंवार सांगितलं जातंय घरीच राहा !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रातून आणि नवी मुंबईतून आज (२६ मार्च) सकाळीच एक दुःखद बातमी समोर येतेय. बातमी आहे आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची. मुंबई मागोमाग आता नवी मुंबईत देखील कोरोनामुळे मृत्यू झालाय. वाशीतील खासगी रुग्णालयालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. सदर मृत्यू 24 तारखेला झालेला होता, मात्र या महिलेचा कोरोना रिपोर्ट येणं बाकी होतं. सदर महिलेचा आज कोरोना रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये ही महिला पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालंय. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित नागरिकांचा मृत्यूचा आकडा ४ वर गेलाय.  

मोठी बातमी - सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर हजर राहण्याचे आदेश 

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ऍडमिट होती. त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सरकारी रुग्णालयात त्यांची  कोरोना टेस्ट देखील करण्यात आली. ही टेस्ट आज पॉझिटिव्ह आलीये. आता सदर महिलेची ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणं आणि ही महिला कुणाच्या संपर्कात होती हे चेक करणं महत्त्वाचं असणार आहे. 

मोठी बातमी -  ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार

प्रभादेवीतील त्या महिलेला कोरोना ? 

मुंबईतील प्रभादेवी भागातील कॉर्पोरेट ऑफिसखाली एक महिलेचा खाण्यापिण्याचा स्टॉल लावत असे.  महिलेच्या खाण्याच्या स्टॉलवर अनेक लोकं यायची. या महिलेला करोनाची लागण झाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

one more death registered due to corona in maharashtra covid 19 death toll reached on 4

loading image