esakal | तेव्हाच मुंबईला आणणार लेव्हल २ मध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Life

तेव्हाच मुंबईला आणणार लेव्हल २ मध्ये

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत कोरोनाची स्थिती (mumbai corona situation) पूर्णपणे नियंत्रणात आलीय. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. राज्य सरकारने अनलॉकसाठी (unlock) ठरवलेल्या पाच टप्प्यांनुसार मुंबईत आत लेव्हल एक मध्ये आहे. म्हणजे मुंबई पूर्णपणे अनलॉक होऊन सर्व काही सुरळीत सुरु झाले पाहिजे. पण मुंबई महानगरपालिकेने (bmc) सलग दुसऱ्या आठवड्यात मुंबईला लेव्हल ३ मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या निर्बंधांमधुन जितकी सवलत तीच कायम राहणार आहे. (One more week like this for Mumbai city to remain at Level 3)

पुढच्या आठवड्यात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांच्या खाली गेला, तर मुंबईत लेव्हल २ च्या अमलबजावणीचा विचार करु, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे. सध्या तरी दुकानांच्या वेळा, कार्यालयीन वेळा आणि लोकल प्रवासासाठी कुठलीही सूट मिळणार नाही.

हेही वाचा: दम लगा के हैशाsss ... वाळकेश्वरचा थरारक Video पाहिलात का?

दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने अनलॉकसाठी पाच स्तरीय कार्यक्रम जाहीर केला. त्यावेळी टीपीआर आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार मुंबई लेव्हल ३ मध्ये होती. टीपीआर पाच टक्क्यांच्या पुढे होता. मागच्या आठवड्यात मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट ४.२० टक्के होता. त्यावेळी सुद्धा मुंबई महापालिकेने लेव्हल २ ची अमलबजावणी केली नाही. राज्य सरकारच्या नव्या परिपत्रकानुसार, मुंबईचा मागच्या आठवड्यातील टीपीआर ३.७९ आहे आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता २३.५ टक्के आहे.

हेही वाचा: ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलने २०० नर्सेसना नोकरीवरुन काढलं

तांत्रिक दृष्टया मुंबई लेव्हल एक साठी पात्र आहे. पण BMC ने मुंबईला लेव्हल ३ मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. "टीपीआर कमी होतोय. आम्ही तो अजून कमी करण्याचा प्रयत्न करु. त्यानंतर निर्बंधात अजून शिथिलता देऊ. पुढच्या आठवड्यातील टीपीआर असाच खाली गेला, तर अजून सवलत देऊ. सध्यातरी निर्बंधात कुठलेही बदल होणार नाहीत" असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले.

loading image
go to top