Mumbai News: सहा महिने पोटदुखी, पण हिमोग्लोबिनची कमतरता मानून दुर्लक्ष; नंतर 21 वर्षीय तरुणीच्या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आलं

Bombay Hospital : बॉम्बे रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये २१ वर्षीय तरुणीच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे तब्बल दीड किलो वजनाचे केस बाहेर काढण्यात आले.
 Mass of hair removed from girl stomach

Mass of hair removed from girl stomach

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून पोटदुखी, उलट्या आणि सतत हिमोग्लोबिन कमी होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या २१ वर्षीय तरुणीच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे तब्बल दीड किलो वजनाचा केस बाहेर काढण्यात आले. बॉम्बे रुग्णालयातील डॉक्टरांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com