वन रुपी क्‍लिनिकला एसटीचा नकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - उपनगरी रेल्वेस्थानकांवर अत्यंत लोकप्रिय ठरलेले वन रुपी क्‍लिनिक कल्याण एसटी स्थानकात उघडण्यास एसटी महामंडळाने परवानगी नाकारल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रास्त दरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या मराठी माणसाच्या रुग्णसेवेला एसटीने झिडकारून आपल्या मनमानीपणाचे प्रदर्शन केले आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करीत आहेत.

ईसीजी, रक्तचाचणी, इतर चाचण्या, तपासण्या, औषधविक्री आदी सेवा अत्यंत रास्त दरात देणारे वन रुपी क्‍लिनिक मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर सुरू आहे. इतकेच नव्हे तर येथील डॉक्‍टरांनी तातडीच्या प्रसूती करण्यापासून कित्येक रेल्वे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यापर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. डॉ. राहुल घुले यांनी सुरू केलेले ही क्‍लिनिक अत्यंत विश्‍वासार्ह असल्याचेही सिद्ध झाले आहे. ही सेवा जास्तीत जास्त नागरिकांना मिळावी यासाठी राज्यातील ३०० आगारांमध्ये क्‍लिनिक सुरू करण्याचा प्रस्ताव घुले यांनी एसटीला दिला होता. क्‍लिनिकसाठी जेमतेम २०० चौरस फूट जागा देणे अपेक्षित आहे. क्‍लिनिकची उभारणी, देखभाल व ते चालविणे ही सर्व कामे घुले यांची ‘मॅजिक डील’ कंपनीच करणार आहे. असे असतानाही कल्याण बस आगारात ही सेवा सुरू करण्यास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (नियोजन व पणन) नकार दिला आहे. 

वाहतुकीस अडथळा ठरणार?
एसटी स्थानकांवर कायम रहदारी असते. वन रुपी क्‍लिनिकला मोक्‍याची जागा द्यायची असल्याने ती वाहतुकीस अडथळा ठरू शकतील. त्यामुळे त्या प्रस्तावास परवानगी देता येत नाही, असे महाव्यवस्थापकांनी कळविले आहे. प्रवाशांअभावी आगारे ओस पडत असून, कॅंटीनही बंद पडली आहेत. अशा स्थितीत प्रवासी आकर्षित करण्याची संधी एसटीने का गमावली, असा प्रश्‍नही विचारला जात आहे.

Web Title: One Rupee Clinic